शाळेत दिली जाणारी मध्यान्ह भोजनाची (मिड-डे मील) गुणवत्ता खालावल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केला आहे. ओडिशातील खुंटा परिसराजवळील एका शाळेतील मुलांनी गुरुवारी दुपारी अचानक बारिपदच्या दिशेने धाव घेण्यास सुरुवात केली.
जेवणाच्या मुद्यावरून शाळांमध्ये चाललेला हा खेळ काही नवीन नाही. आजूबाजूच्या गावांमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच एकच गरदी जमली आणि मुलांनी जेवणाबाबतचा खरा प्रकार सर्वांसमोर उघड केला.
शाळांमध्ये वेळेवर आणि चांगल्या दर्जाचे अन्न मिळत नाही, असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. चिमुरड्यांच्या आरोग्याशी अशा प्रकारे खेळणे कितपत योग्य आहे? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक चाललेले दुर्लक्षच या सगळ्या प्रकाराला कारणीभूत आहे.
मुलांनी अशा प्रकारे अचानक रस्त्यावर येऊन धाव घेतल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कारवाई केली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूप धारण करू शकते, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
written by www.afoxtv.com


















टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा